जनरल नॉलेज

Mosquito repelling plants क्षणात होतील डास गायब घरात ठेवा ही झाडे

क्षणात होतील डास गायब घरात ठेवा ही झाडे
घरातील डासाने प्रत्येक जण परेशान असतो परंतु हा उपाय केला तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, डासांचा त्रास मुख्यतः सायंकाळी सुरुवात होते तुम्हाला अंगणात किंवा बाल्कनीत बसणे ही अवघड होऊन जाते मलेरिया सारखे आजार होतात आज आम्ही तुम्हाला याच डासावर रामबाण उपाय सांगणार आहोत खाली सांगितलेले झाडे जर तुमच्या घरात ठेवली तर तुमच्या घरात चुकूनही डास येणार नाहीत तर मग मित्रांनो जाणून घेऊया ही पाच झाडे कोणती
1.तुळस:तुळस हे सर्वांच्या परिचयाची आहे आपल्या घरात जर एक तुळशीच्या रुपाची अनेक तुळशीची रोपे असतील तर मित्रांनो तुम्हाला डासांचा कधीच त्रास होणार नाही त्यामुळे घरात जर तुमच्या जागा असेल तर विविध कुंडीत तुळशीचे रोपे लावा आणि डासापासून कायमची मुक्ती मिळवा

२.झेंडू:आज पर्यंत तुम्ही झेंडू चा वापर घरातील देवांना माळा बनवण्यासाठी किंवा घरातील विविध शोभा वाढवण्यासाठी किंवा गाडीला घालण्याचा हार बनवण्यासाठी केला असेल पण झेंडूच्या वासाने घरातील डास पळून जातात फुलाच्याच वासाने नाही तर घरात जर झेंडूचे रोप असेल तरीही डास घरात येत नाही त्यामुळे मित्रांनो घरात झेंडूचे रोप लावणे खूप फायदेशीर आहे

३.लसून:आपण रोजच्या जेवणात लसणाचा वापर भाजीसाठी करतो परंतु लसणाच्या वासाने घरातील डास पळून जातात, जर घरात लसणाचे रोप असेल तर डास घरात कधीही येणार नाही

४.लॅवेंडर:डासांना पळवण्यासाठी वापर केला जातो त्यामध्ये लाईव्ह असते त्यामुळे डास पळून जातात

५.लेमन ग्रास:आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये लेमन ग्रास आढळून येतो,यातील अनेक व्यक्ती याचा वापर चहा बनवण्यासाठी करतात पण मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की याच ग्रास मुळे घरातील डासही गायब होतात बाजारात डास पळवणारे औषधे भेटतात त्यापैकी अनेक औषधात या लेमन ग्रास चा वापर केला जातो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button