शेतकरी बांधवानो मार्केट रेट पेक्षा जास्त रेट ने म्हणजे हमीभाव ने सरकारला विका तुमचा हरभरा
2023 नोंदनी सुरु
शेतकऱ्यांनो मार्केट रेट पेक्षा जास्त रेट ने म्हणजे हमीभाव ने सरकारला विका तुमचा हरभरा
2023 नोंदनी सुरु
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासन हमीभावाने म्हणजे किमान आधारभूत किमतीने हरभरा या पिकाची खरेदी करतात म्हणजे शेतकरी मित्र सर्व शेतकरी आपल्या हरभराचे शासन दरबारी नोंदणी करून हरभरा हे शासकीय हमीभावाने म्हणजे मार्केट रेट पेक्षा किमान एक हजार रुपये तरी जास्त भावाने तुमच्या हरभरा शासनाला विकू शकता.ज्याकरता महाराष्ट्र सरकारने चालू हंगाम सन 2022 23 साठी ची हमीभाव ठरवून दिलेला असतो त्या दराने तुमचा हरभरा शासनाला विकू शकता त्यामध्ये 2022 23 चा दर आहे 5330 रुपये प्रति क्विंटल तर म्हणजे तुम्ही ह्या दराने शासनाला तुमचा हरभरा विकू शकता पण यासाठी तुमच्या हरभरा या पिकाची शासनाकडे ऑनलाईन नोंदणी केलेली पाहिजे तर 2023 चे हरभरा हमीभाव नोंदणी सुरू झालेली आहे.
जर तुम्हालाही तुमचा हरभरा शासनाकडे किमान आधारभूत किमतीने विकायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा हरभरा ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर तुम्हीही लवकरात लवकर तुमच्या हरभऱ्या पिकाची नोंदणी ऑनलाईन करून घ्यावी तरच तुम्हाला तुमचं हरभरा पिकाला बाहेरच्या पेक्षा म्हणजे मार्केट रेट पेक्षा जास्त रेटने तुम्ही शासनधारक विकू शकता आणि असं पाहायला गेलं तर किमान एक हजार रुपयांचा दरामध्ये फरक पाहायला मिळतो.
हरभऱ्याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची?
शेतकरी मित्रांनो ऑनलाईन नोंदणी करणे खूप अवघड नाहीये तर तुम्हाला तुमचा हरभरातील किमान आधारभूत किमतीने विकायचे असेल तर ऑनलाईन करण्यासाठीची प्रोसेस आहे ही एकदम सोपी आहे त्यासाठी तुम्हाला दरवर्षी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे शासनाच्या अनेक पिकांच्या ऑनलाईन नोंदणी करून घेते त्याप्रमाणे याची पण ऑनलाईन नोंदणी करणे शक्य आहे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसेच हरभरा शासनमान्य हरभरा खरेदी केंद्र मध्ये तुमच्या हरभरा पिकाची नोंदणी करू शकता.
ऑनलाइन नोंदणी केल्यास किती भाव मिळेल?
शेतकरी बांधवांनो ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सरकारी हमीभाव मिळेल म्हणजे यावर्षीचा सरकारने हरभरा हमीभाव जो आहे तो 5330 रुपये प्रति क्विंटल इतका जाहीर केलेला आहे. म्हणजे फेडरेशन कडे तुम्ही ऑनलाईन नोंदणी केल्यास तुम्हाला हा भाव मिळणार आहे.
तुमच्या हरभऱ्याची नोंदणी कधी करायची?
शेतकरी बांधवांनो तुमच्या 2023 च्या हरभरा पिकाची नोंदणी ही कधी करणे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला या पिकाची नोंदणी 27 फेब्रुवारीपासून म्हणजे आज पासून तुमची ही नोंदणी सुरू झालेली आहे. मित्रांनो सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा हरभरा हा निघालेला आहे व अत्यंत कमी भाव मध्ये खाजगी बाजारामध्ये या पिकाची विक्री करत आहे परंतु मित्रांनो खाजगी भावामध्ये विकण्यापेक्षा तुम्हाला जर जास्त भाव मिळत असेल तर तुम्ही इकडे विकणे गरजेचे आहे त्यामधून तुमचं किमान प्रतिक्विंटर १००० रुपयाचं तरी नुकसान कळेल.
परंतु आजपर्यंत शासनाकडून हरभरा खरेदी सुरू झालेली नव्हती परंतु आत्ता हरभरा हमीभाव नोंदणी 2023 सुरू करण्यासाठीचे महाराष्ट्र राज्य पणन व सहकार मंडळ विभागामार्फत हमीभावाने सुरू खरेदी सुरू करण्यासाठी जी नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत व त्याचे परिपत्रक काढून 2023 ची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे तरी आपण लवकरात लवकर सुरू करावे व ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना पाठवावे जेणेकरून सर्वांचं नुकसान कळेल फायदा होईल.
हमीभाव नोंदणी झाल्यानंतर तुमच्या हरभऱ्याची विक्री कुठे करायचे?
शेतकरी बांधवांनी तुमच्या मनात याबद्दल पडणारा मोठा प्रश्न म्हणजे तुमची नोंदणी कुठे करायची व नंतर विक्री कुठे करायची?
तर राज्य शासनाच्या पणंन महासंघाद्वारे विविध प्रकारच्या हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच आता शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार तुम्हाला 27 फेब्रुवारीपासून नोंदणी ची प्रक्रिया सुरू झालेले आहे व नोंदणी हे तुम्ही जिल्हा मार्केटिंग मध्ये शासनाचे आदेश पोचल्यानंतर सुरू झालेले आहे तुम्ही हे आदेश पोहोचल्यानंतर शासनाच्या सातही साठी खरेदी केंद्रावर ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेटून नोंदणी करून घ्यावी
हरभरा हमीभाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
शेतकरी बांधवांनो तुमचा हरभरा तुम्हाला शासन हमीभाव आणि विकायचा असेल तर तुम्हाला खाली कागदपत्रे लागते.
1. हरभरा पिकाचा सातबारा उतारा
2. सातबारावर ऑनलाईन पीक पेराची नोंद असावी
3.आधार कार्ड
4. बँकेचे पासबुक
तर शेतकरी बांधवांना अशाप्रकारे हरभरा हमीभाव खरे दिलेले नोंदणी प्रक्रियेची माहिती या अपडेट द्वारे आपणास दिलेली आहे ही माहिती अतिशय महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसोबत शेअर करावे अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला द्यावी