ChatGPT News Marathi: ChatGPT-4 लवकरच लॉन्च होणार, काय काय नवीन फिचर असणार ?
ChatGPT News: ChatGPT चे नवीन सुधारित व्हर्जन म्हणजेच ChatGPT-4 हे मार्च च्या चौथ्या आठवड्यात म्हणजे पुढील आठवड्यात Microsoft ChatGPT-4 लाँच करणार आहे.
यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने अधिक सुविधा दिल्या जाणार आहेत जेणे करून यूजर्सना आता कन्टेन्ट सोबात व्हिडीओ कन्टेन्ट पण जनरेट करता येणार आहे तसेच पाहता येणार आहे.
पुढल्या आठवड्यात ChatGPT-4 हे नवीन सुधारित मॉडेल लॉन्च होणार आहे असे OpenAI ChatGPT चे मुख्य गुंतवणूक कंपनी Microsoft ने जहाल केले आहे. हे सुधारित मंडल अतिशय प्रभावी असणार आहे, ChatGPT हे यूजर्स ना सध्या लिखित स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असत तसेच आता ChatGPT-4 मध्ये यूजर्स ना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहेत.
OpenAI ने सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या धर्तीवर अनेक सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी आहे. Microsoft तर्फे असे सांगण्यात आले आहे कि ChatGPT-4 हे एक अधिक सक्षम असणार आहे.
मायक्रोसॉफ्ट चे मुख्य टेक्निकल हेड श्री. अँड्रियास ब्रॉन यांनी एका जर्मन न्यूज कंपनीला बोलताना असे घोषित केले आहे कि आम्ही पुढील आठवड्यात ChatGPT-4 सादर करणार आहोत ज्यामध्ये मल्टि मॉडेल्स असतील व जे पूर्णपणे वेगवेगळे रिपोर्ट्स द्यायला तयार असेल ज्यामध्ये आम्ही यूजर्स ना व्हिडिओ स्वरूपात पण रिपोर्ट्स देणार आहोत.
वापरकर्त्यांना कसा प्रतिसाद देणार ChatGPT-4
जगभरातील विविध भाषांचा समावेश असल्यामुळे GPT-4 आता नवनवीन माहित लिखित, ऑडिओ व व्हिडीओ स्वरूपात देणार आहे कारण त्यापद्धतीने हे बनवले आहे. पण नक्की याचा फायदा काय होणार ते आपण खाली दिले आहे.
ChatGPT-4 मध्ये नवीन काय असणार आहे ?
विविध मॉडेल्स क्षमता याशिवाय ChatGPT-4 आता यूजर्सना लवकरात लवकर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे कारण पूर्वीच्या मॉडेल मध्ये हे वविविध भाषा नसल्यामुळे शक्य नव्हते.
तसेच OpenAI चे सध्या कोणतेही Mobile App नव्हते तर ते पण आता GPT-4 द्वारे मार्केट मध्ये प्रसारित केले जाणार आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना आता त्यांच्या मोबाईल मध्ये हि याचा वापर करता येणार आहे.
Microsoft चे सर्च इंजिन Bing मध्ये GPT-4 दिसणार आहे.
जसे कि OpenAI मध्ये Microsoft हा मुख्य गुंतवणूक दार आहे त्यामुळे त्यांच्या Bing Search मध्ये कनेक्टेड असण्याची शक्यता आहे पण याबद्दल दोन्ही कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झालेले नाही, पण Bing Search हे कनेक्ट करण्याची एक चांगली संधी आहे.
सध्या GPT-3 आणि GPT-3.5 हे सध्या Microsoft चे तंत्रज्ञान वापरात असल्यामुळे जलद प्रतिसाद देणाया मदत होते ज्यामध्ये ते रिअल टाइम डेटा वापरतात. त्यामुळे GPT-4 हे पण त्याच धर्तीवर विकसित केले आहे.
जेव्हापासून OpenAI ने ChatGPT लाँच केले आह तेंव्हा पासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या वापराबाबत इंटरनेट यूजर्समध्ये प्रचंड लोकप्रियता आहे.