उद्योग, व्यापार यशस्वी करायचा
तर उधार देणे अगोदर बंद करा
उद्योग, व्यापार यशस्वी करायचा
तर उधार देणे अगोदर बंद करा
उधारी आणि व्यवसाय यांचे नाते वेगळेच
आहे. धरले तर चावतंय आणि सोडले तर
पळतंय, उधार द्यायचे नाही तर मग धंदा होत
नाही आणि उधार दिले तर वसूल होत नाही,
अशी सध्या मार्केटला परिस्थिती झाली आहे,
मी म्हणतो उधारी देऊन नुकसान
होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेले काय
वाईट? लोकांना फुकट तुम्ही कुबेराचे
नातेवाईक आहात का? उधारीवर बाजारात खूप
मजेशीर किस्से आहेत ,“उधार एक जबरदस्त
जादू है; हम उधार देंगे आज तो कल आप गायब
हो जायेंगे ” उधार ८० साल के उपरवाले को
मिलेगा, वो भी उनके माता-पिता को पुछकर :
उधारी बंद करण्याचे सात नियम :-
■ हिशेब ठेवायला माणूस / मुनीम नाही आहे.
■ वसुलीसाठी कामगार नाही .
■ चार चार वेळेला येण्याकरिता वाहन नाही.
■ बार बार फोन करण्यासाठी मोबाइलमध्ये
रिचार्ज नाहीये
■पैसे वसुलीसाठी गुंडे नाही आहे.
■उधार माफ करण्यासाठी आम्ही कुबेरचे
नातेवाईक नाही.
■तुमची आठवण काढायला तुम्ही काही
आमची प्रियजन नाही.
उधारी बंद केल्यामुळे फायदेही होतात.
आपण ग्राहकाला राजा म्हणतो : ग्राहक राजा
होता है और राजा कभी उधार नही मांगता
है, हमने इस कदर उधार लिया है दोस्त, की
अब दुकानदार भी हमारी लंबी उम्र की दुआ
करते है / धारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता
विकत घेता व चिंता ही चिता समान असते. जी
माणसाला हळू हळू मारते.
अजिबात उधार न
दिल्याचे व्यवसाय फायदे होतात.
■डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.
■तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू
शकता.
■लोकांशी संबंध बिघडणार नाही,परिणामी
मानसिकस्थिती चांगली राहील.
■उधारीवरून भांडणे होतात. आपलेच पैसे
आणि आपणच भांडण करायचे.
■उधारीमुळे नुकसान झाल्यास तुमचा
चांगुलपणा तुम्हालाच भोवतो. लोक तुम्हाला
येड्यात काढू लागतात.
■माल खपला नाही तर दानधर्म करेन पुण्य तरी
मिळेल. पण उधार देऊन डोक्याला ताप नको.
एक प्रसंग सांगतो या उसनवारीमुळे माझ्या
जवळचा चांगला मित्र फक्त ५०,०००/- साठी
कायमचा मला बोलणे बंद झाला. काय तर
मी त्याला उधार / उसने पैसे दिले, जर असे
होत असेल तर कशाला उधार देऊन आपले
संबंध खराब करायचे, असे मला वाटते. उधारी
म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू आहे, १
रुपयाच्या मार्जिनवर धंदा करेल; पण कुणाकडून
उधार घेणार नाही आणि देणार पण नाही, अशी
खूणगाठ जर बांधली तर व्यवसायात नक्की
फायदा होईल. कुणाशी किती जरी दुशमनी
असेल तर आपण जातो; पण उधार घेणार
कधीच येत नाही हे सत्य आहे. उधारी माणसात
इतके वाईट अंतर निर्माण करते, उधारी देणारा
व्यापारी इतका त्रासतो कधी कधी त्यातच तो
मरतो आणि त्याच्या तेरवीला कावळा पण शिवत
नाही. त्याच्या आत्म्याला सुद्धा वसुलीची आशा
असते आणि या उधारीमुळे त्याच्या आत्म्यालाही
शांति लाभत नाही, अशी असते ही उधारी.